Abhinav Mohod : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे (महाराष्ट्र राज्य) तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अभिनव सुशील मोहोड याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात मिळवलेल्या या यशामुळे अमरावती विभागासह अकोला जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

बोरगाव मंजू : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे (महाराष्ट्र राज्य) तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अभिनव सुशील मोहोड याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात मिळवलेल्या या यशामुळे अमरावती विभागासह अकोला जिल्ह्याचा मान उंचावला आहे.
माजी सैनिक अभिमान व्यायामशाळा, कुरणखेड तसेच श्री व्यंकटेश बालाजी हायस्कूल, मुर्तिजापूर येथील विद्यार्थी असलेल्या अभिनवने राज्यातील आठ विभागांतील स्पर्धकांमध्ये दमदार कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती आणि मराठवाडा विभागांचा सहभाग होता. त्यामध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत अभिनवने कांस्यपदक जिंकून उल्लेखनीय यश संपादन केले.
अभिनवच्या या यशाबद्दल अमरावती विभाग, अकोला जिल्हा, शाळा आणि मूळ गावात सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने संस्थेचे अध्यक्ष अवधूत ढोरे, शाळेच्या प्राचार्या सारिका कडू, क्रीडा शिक्षक निलेश उंबरकर, तसेच आई-वडिलांना दिले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

