Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Siddheshwar Vidyalaya in Dhaba :धाबा येथील सिद्धेश्वर विद्यालयात रंगले विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

Siddheshwar Vidyalaya in Dhaba : तालुक्यातील धाबा येथील सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दि. २४ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या कौशल्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Siddheshwar Vidyalaya in Dhaba.

बार्शीटाकळी : तालुक्यातील धाबा येथील सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दि. २४ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या कौशल्यांसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात नृत्य, हास्यविनोद, नाटिका, गीतगायन, वक्तृत्व कला, मूकनाटिका आदी विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनिल धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक नितीन मानके यांनी या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास दामिनी पथकाच्या महिला पोलीस छाया गवई, कल्याणी काळे तसेच बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे धनराज राऊत, विष्णू ढोरे, राजू बाभुळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दामिनी पथकाच्या वतीने विद्यार्थिनींना स्वसंरक्षण, तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व्ही. जे. मुंदे, ए. आर. बेडसे, एस. व्ही. आखरे, डी. पी. ढोम्बळे, व्ही. एस. फोकमारे, एस. आर. निघोट, जे. एम. बोचरे, पी. बी. ढोरे, एन. एम. पातोंड, एस. टी. मोघाड, पी. पी. बोंद्रे, यु. ए. तीप्पावाड, के. जी. ठाकरे, एस. व्ही. भाकरे, संदीप जाधव, आशा उंबरकार, आर. एस. कापकर, डी. बी. आगे, नारायण जाधव, उमेश राठोड तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. बी. एम. बडवे, प्रा. व्ही. ए. टापरे, प्रा. एस. एस. अहिर, प्रा. पी. एस. रायपुरे, प्रा. एस. व्ही. बोरोडे, प्रा. आर. पी. मोहोड, विनोद पाटील आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाल्याने शालेय वातावरण आनंदमय झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top