Mahabreaking

[breaking_news]

13 animals rescued :गुरांची निर्दयीपणे वाहतुक ; १३ जनावरांना दिले जीवनदान, बोलेरो पिकअप जप्त

13 animals rescued :नागपूरहून अकोल्याकडे गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करून कत्तलीसाठी नेत असलेला एक प्रकार बोरगाव मंजू पोलिसांनी उधळून लावला. या कारवाईत बोलेरो पिकअपमधून कोंबून नेण्यात येत असलेली तब्बल १३ गोवंश जनावरे सुखरूप वाचविण्यात आली असून संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे. मात्र वाहन चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे.

 

Cruel transportation of cattle
कुरणखेड टोलनाक्याजवळ पहाटेची कारवाई; चालक वाहन सोडून फरार

 
अकोला : नागपूरहून अकोल्याकडे गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करून कत्तलीसाठी नेत असलेला एक प्रकार बोरगाव मंजू पोलिसांनी उधळून लावला. या कारवाईत बोलेरो पिकअपमधून कोंबून नेण्यात येत असलेली तब्बल १३ गोवंश जनावरे सुखरूप वाचविण्यात आली असून संबंधित वाहन जप्त करण्यात आले आहे. मात्र वाहन चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत ओंकार अनासने (वय २२, व्यवसाय शिक्षण, रा. शिवमंदिराजवळ, बोरगाव मंजू) यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, नागपूर येथून अकोल्याकडे पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्रमांक MP-15 G 5374) मधून १० ते १२ गोवंश जनावरे निर्दयतेने भरून कत्तलीसाठी नेण्यात येत आहेत. या माहितीच्या आधारे त्यांनी तत्काळ पोलिसांना कळविले.
पोलीस हवालदार प्रमोद गोपनारायन व पथकाने नमूद ठिकाणी सापळा रचून संबंधित वाहन अडविले. पोलिसांना पाहताच बोलेरो पिकअपचा चालक वाहन जागेवरच सोडून पळून गेला. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये कोंबून भरलेली १३ गोवंश जनावरे आढळून आली. या जनावरांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी सदर बोलेरो पिकअपसह जनावरे पोलीस ठाण्यात आणून पंचनामा केला व फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, फरार चालकाचा शोध सुरू असून या गोवंश तस्करीमागे कोणते टोळके कार्यरत आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे गोवंश तस्करीविरोधात पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेचे कौतुक नागरिकांतून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top