damaging the pole : शहरातील दिनदयाळ शाळेसमोरील दे. राजा–चिखली रोडवर भरधाव चारचाकी वाहनाने स्ट्रीट लाईट पोलला जोरदार धडक दिल्याची घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल ; अडीच लाख रुपयांचे झाले नुकसान
देऊळगाव राजा : शहरातील दिनदयाळ शाळेसमोरील दे. राजा–चिखली रोडवर भरधाव चारचाकी वाहनाने स्ट्रीट लाईट पोलला जोरदार धडक दिल्याची घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी विशाल सैवर (वय 38, विद्युत अभियंता, न.प. देऊळगाव राजा, रा. संभाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, MH-19-BU-1665 क्रमांकाची वाहनाने रस्त्यालगत असलेल्या स्ट्रीट लाईटच्या पोल क्रमांक 29 ला जोरदार धडक दिली. धडकेमुळे 9 मीटर लांबीचा पोल कोसळून त्यावरील दोन सोलार लाईट, दोन बॅटऱ्या, सोलार पॅनल, दोन ब्रॅकेट, आयर्न प्लेट, पॅनल बोर्ड यासह अन्य साहित्यांचे एकूण ₹2,52,755/- मूल्याचे नुकसान झाले असल्याचे नगरपरिषद देऊळगाव राजा यांनी कळविले.घटनेनंतर वाहनचालक पसार झाला. फिर्यादीच्या तोंडी अहवालावरून अज्ञात चालकाविरुध्द कलम 281, 324(2) भा.दं.सं. (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ नारायण गीते करीत आहेत.

