Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

wires stolen : दगडवाडी शिवारात १५ पोलवरील तार केले लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल

wires stolen : दगडवाडी ते चिंचोली शिवारात उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रीक पोलवरील तारांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. एकूण १५ पोलवरील अंदाजे ₹१,३७,३९३ किंमतीची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

wires from 15 utility poles were stolen
देऊळगाव राजा : दगडवाडी ते चिंचोली शिवारात उभारण्यात आलेल्या इलेक्ट्रीक पोलवरील तारांची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. एकूण १५ पोलवरील अंदाजे ₹१,३७,३९३ किंमतीची तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर कैलास म्हस्के (वय ३४) हे ASHOKA BUILDCON LIMITED कंपनीकडून संबंधित भागात ८५ इलेक्ट्रीक पोल उभारणी व वायरिंगचे काम पाहत होते. ५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून ६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या दरम्यान दगडवाडी शिवारातील १५ पोलवरील तार अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याचे त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.प्राथमिक तपासानुसार चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास पोलवरील तार कापून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 303(2) बी.एन.एस. अंतर्गत गुन्हा नोंदविला. सदर प्रकरणाची नोंद पोहेका माधव कुटे यांनी घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मपोउपनि ढाकणे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top