Mahabreaking

[breaking_news]

reservation! धनगर समाजाच्या आरक्षणासाठी विदर्भात जनसंवाद यात्रा!

  reservation! धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी २१ जानेवारी २०२६ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे होणाऱ्या “मुक्तीसंग्राम” आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी मल्हार योद्धे दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या विदर्भ जनसंवाद दौऱ्याची सुरूवात १५ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे. सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून सकाळी ९ वाजता या दौऱ्याची विधिवत सुरुवात होणार आहे.

Dhangar community!

मल्हार योद्धे दीपक बोऱ्हाडे यांचा ‘विदर्भ जनसंवाद दौरा’ १५ डिसेंबरपासून

धोत्रा नंदाई : धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी २१ जानेवारी २०२६ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे होणाऱ्या “मुक्तीसंग्राम” आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी मल्हार योद्धे दीपकभाऊ बोऱ्हाडे यांच्या विदर्भ जनसंवाद दौऱ्याची सुरूवात १५ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे. सिंदखेड राजा येथे माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळाला अभिवादन करून सकाळी ९ वाजता या दौऱ्याची विधिवत सुरुवात होणार आहे.

धनगर समाजाच्या हक्क, न्याय आणि आरक्षण अंमलबजावणीबाबत जनतेत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. दिवसभरात बोऱ्हाडे विविध ठिकाणांवर जनसंवाद सभा घेऊन समाजबांधवांना आंदोलनात व्यापक प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत.

दौऱ्याचे वेळापत्रक :

  • सकाळी १० वा. – जवळखेड
  • सकाळी ११ वा. – देवळगाव मही
  • दुपारी १ वा. – चिखली
  • दुपारी ३ वा. – अमडापूर
  • सायंकाळी ५ वा. – लाखनवाडा
  • रात्री ८ वा. – खामगाव

या जनजागृती मोहीमेतील सभांना ग्रामस्थ, युवक, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा अधिक बळकट करण्यासाठी २१ जानेवारीच्या मुंबईतील आंदोलनासाठी व्यापक जनसमर्थन उभारण्याचे प्रयत्न या दौऱ्यातून होणार आहेत.

दीपक बोऱ्हाडे यांनी विदर्भातील धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने आंदोलनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले असून, सामाजिक न्यायाच्या या लढ्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top