Mahabreaking

[breaking_news]

 safe transportation :चालकांच्या सन्मानातून सुरक्षित वाहतुकीचा संदेश

safe transportation : राज्यातील वाहतूक व दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेल्या चालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अकोला प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी ‘चालक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान चालकांचा सन्मान करून सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे आणि दुचाकीवर हेल्मेट वापरणे या सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

 safe transportation

अकोला आरटीओच्या वतीने ‘चालक दिन’ उत्साहात साजरा

अकोला : राज्यातील वाहतूक व दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेल्या चालकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अकोला प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने गुरुवार, दि. १७ सप्टेंबर रोजी ‘चालक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान चालकांचा सन्मान करून सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे आणि दुचाकीवर हेल्मेट वापरणे या सुरक्षित वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक श्रीमती सीमा खेते, तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रसन्न टिकार यांनी अकोल्यात विविध ठिकाणी चालकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात, तसेच अग्निशमन दलाच्या कार्यालयात जाऊन बसचालक, वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी आणि इतर वाहनचालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चालकांनी सुरक्षित वाहनचालनाची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा संदेश देण्यात आला.

वाहतूक क्षेत्रातील चालक देशाच्या दैनंदिन गरजा, प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, त्यांचा उचित सन्मान व्हावा या उद्देशाने दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. या उपक्रमांतर्गत वाहनचालकांना गुलाबपुष्प व शुभेच्छा देऊन त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top