Mahabreaking

🔴 BREAKING
Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद Driving test will be completely digital :ड्रायव्हिंग टेस्ट होणार पूर्णपणे डिजिटल! अकोला आरटीओत ‘ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक’ उभारणीला सुरुवात burglary attempt :बीबी येथे भरदिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला; घरातच बंदिस्त केलेल्या चोरट्याला पोलिसांनी पकडले sand smugglers :रेती तस्करांचा पाठलाग करत महसूल पथकाची धडक कारवाई; टिप्पर जप्त Shocking incident :दगडवाडी फाट्यावर धक्कादायक घटना; चार अज्ञातांनी इसमाला कारमध्ये बसवून लुटले Clashes over solar pump dispute :विहिरीवरील सोलार पंपाच्या वादातून हाणामारी; रोहना येथे सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल Buddhist communitys bride-groom introduction : बाळापूर येथे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; अकोला-वाशिममधून प्रतिसाद

A hardened criminal :खामगाव-शेगाव शहरात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद;  ८.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

A hardened criminal : खामगाव व शेगाव शहरांतील घरफोडी प्रकरणांचा स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वी छडा लावत अट्टल गुन्हेगाराला जालन्यातून अटक केली. आरोपीकडून सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन व मोबाईलसह एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

A hardened criminal

स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाची कारवाई; सराईत आरोपीविरुध्द 27 गुन्हे दाखल

बुलढाणा : खामगाव व शेगाव शहरांतील घरफोडी प्रकरणांचा स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वी छडा लावत अट्टल गुन्हेगाराला जालन्यातून अटक केली. आरोपीकडून सोन्याचे दागिने, चारचाकी वाहन व मोबाईलसह एकूण ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.

जिल्ह्यात वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा व खामगाव शहर पोलिसांना सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर (स्थानिक गुन्हे शाखा) व पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार (खामगाव शहर) यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. शेगाव शहर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ४९/२०२६ सह संबंधित घरफोडी प्रकरणांचा बारकाईने तपास करून १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी रवि राजूमल होतबानी (रा. सिंधी कॉलनी, झुलेलाल नगर, खामगाव) यांनी तक्रार दिली होती की, २४ जानेवारीच्या रात्री ते २५ जानेवारीच्या सकाळी दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्या काकांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याचे कंगण, चैन, नेकलेस व मंगळसूत्र असा सुमारे २ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी खामगाव शहर व शेगाव शहर पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद होते.

तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी संजयसिंग कृष्णासिंग भादा (वय ३०, रा. गुरुगोविंदनगर, जालना) याला जालना शहरातून अटक केली. आरोपीकडून  ३० ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत अंदाजे ४.५० लाख रुपये), स्कोडा कंपनीची चारचाकी गाडी (किंमत अंदाजे २.५० लाख रुपये), एक मोबाईल (किंमत अंदाजे २० हजार रुपये) असा एकूण ८.२० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी संजयसिंग भादा याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत एकूण २७ गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चौकशीत त्याने खामगाव व शेगाव येथील घरफोड्यांची कबुली दिली असून जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांत सहभाग मान्य केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने तर अपर पोलीस अधीक्षक खामगांव श्रेणिक लोढा,   अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल अंबुलकर स्था.गु.शा. बुलढाणा, पोनि. रामकृष्ण पवार पो.स्टे. खामगांव शहर यांचे नेतृत्वात पोउपनि. पंकज सपकाळे, पोहेकॉ. एजाज खान, पोकॉ. अमोल शेजोळ, विक्रांत इंगळे, अजिस परसुवाले स्थानिक गुन्हे शाखा-बुलढाणा, सपोनि, विकास पाटील, पोहेकॉ. भिमराव वानखडे, पोकों, गणेश कोल्हे, अंकुश गुरुदेव, राहूल थारकर पो.स्टे. खामगांव शहर तसेच पोकॉ. ऋषी खंडेराव तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top