Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Brutal murder :सावरगाव मुंढे येथे जमीनीच्या वादातून युवकाची निर्घृण हत्या,वडीलांसह भावाविरुध्द गुन्हा

Brutal murder : सावरगाव मुंढे येथे शेतीच्या जमिनीच्या वादातून ३२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून मृतकाचे वडील आणि भावाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गणेश चव्हाण (वय ३२, रा. सावरगाव मुंढे, ता. लोणार) असे मृतकाचे नाव आहे. लोणार पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Brutal murder
शेत जमीनीच्या हिस्स्यावरून व मुलगी झाल्यामुळे सुरू होता कुटुंबाशी वाद;दोन्ही आरोपींचा शोध सुरू

लोणार: सावरगाव मुंढे येथे शेतीच्या जमिनीच्या वादातून ३२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून मृतकाचे वडील आणि भावाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा गणेश चव्हाण (वय ३२, रा. सावरगाव मुंढे, ता. लोणार) असे मृतकाचे नाव आहे. लोणार पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मृतक कृष्णा गणेश चव्हाण यांचा शेतीच्या जमिनीच्या हिस्स्यावरून कुटुंबीयांशी वाद सुरू होता. तसेच विवाहानंतर सहा वर्षे अपत्य न झाल्याने व नंतर मुलगी झाल्याच्या कारणावरूनही कुटुंबात वाद होत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या पार्श्वभूमीवर आरोपी गणेश रूपचंद चव्हाण (वडील) व सोनु गणेश चव्हाण (भाऊ) यांनी मृतकास जमीनीचा हिस्सा न देण्याच्या कारणावरून भांडण करत डोक्यावर कठोर वस्तूने मारहाण करून ठार मारल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर रेणुका कृष्णा चव्हाण (वय ३०) यांनी लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक झालेली नसून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर, ठाणेदार प्रकाश सदगीर व तपास अधिकारी पोउपनि धनंजय इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top