Mahabreaking

[breaking_news]

  A golden opportunity: वैद्यकीय क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी; स्किल पॅरामेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

A golden opportunity: आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा येथे विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनमान्य अभ्यासक्रम, आधुनिक सुविधा आणि प्लेसमेंट सहाय्य यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या संस्थेबाबत विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

A golden opportunity

 १० वी, १२ वी व पदवीधर विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची मेजवानी

बुलढाणा : आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा येथे विविध रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनमान्य अभ्यासक्रम, आधुनिक सुविधा आणि प्लेसमेंट सहाय्य यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या संस्थेबाबत विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

A golden opportunity

महाविद्यालयामध्ये पीजी डीएमएलटी (PG DMLT), डीएमएलटी (DMLT), हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर, डिप्लोमा इन अॅक्युपंक्चर थेरपी, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, बांधकाम पर्यवेक्षक, जीएनएमए तसेच एक्स-रे टेक्निशियन अँड रेडिओलॉजी यांसारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. १० वी, १२ वी तसेच बी.एस्सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.

महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना शासनमान्य राजमुद्रा असलेले प्रमाणपत्र, १०० टक्के प्लेसमेंट सहाय्य तसेच स्वतःची लॅब किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कौन्सिलमध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या संधीही प्राप्त होतात.

संस्थेमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणकीकृत पॅथॉलॉजी लॅब, डिजिटल स्मार्ट क्लासरूम, प्रशस्त कॉम्प्युटर लॅब, अद्ययावत ग्रंथालय, नियमित प्रात्यक्षिके, रक्त तपासणी शिबिरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शैक्षणिक सहली आणि विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असल्याचा दावा संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांसाठी थेट प्रवेशाची सुविधा उपलब्ध असून कोणतीही प्रवेश परीक्षा अथवा गुणांची अट नाही. तसेच अत्यल्प शुल्क, फी सवलत आणि बँक कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मर्यादित प्रवेश असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरीत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क : ९४२२९४५८११

पत्ता :

स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल,

वानखेडे ले-आऊट, डॉ. मेहेत्रे हॉस्पिटलजवळ,

रेणुका टायपिंग समोर, बुलढाणा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top