Mahabreaking

[breaking_news]

A fun-filled first day :हसत-खेळत शाळेचा पहिला दिवस; अली पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

A fun-filled first day : अली पब्लिक स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि विद्यार्थ्यांच्या निरागस हास्याने झाली. प्राथमिक विभागाचे शैक्षणिक सत्र ३० जूनपासून, तर पूर्व-प्राथमिक (प्री-प्रायमरी) विभागाचे सत्र १ जुलैपासून सुरू झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी परिसरात उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

A fun-filled first day
भेटवस्तू, मिकी माऊस आणि आनंदी वातावरणात अली पब्लिक स्कूलचा प्रवेशोत्सव

बाळापूर : अली पब्लिक स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि विद्यार्थ्यांच्या निरागस हास्याने झाली. प्राथमिक विभागाचे शैक्षणिक सत्र ३० जूनपासून, तर पूर्व-प्राथमिक (प्री-प्रायमरी) विभागाचे सत्र १ जुलैपासून सुरू झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी परिसरात उत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

add
विद्यार्थ्यांचे शाळेच्या शिक्षकांनी उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना आकर्षक भेटवस्तू प्रदान केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस संस्मरणीय ठरला. दिवसभर विद्यार्थ्यांनी खेळ, मनोरंजन आणि विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

add
यावेळी शाळेचे सचिव डॉ. झुबैर नदीम, अध्यक्ष तौसीफुर रहमान, संचालिका अंबर काझिम मॅडम तसेच नुरीन हिबा मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे स्वागत करून त्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेत विद्यार्थ्यांसाठी मिकी माऊस हे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत आनंदाने वेळ घालवला तसेच आठवणी म्हणून छायाचित्रेही काढली.

add
नवीन विद्यार्थ्यांना शाळेच्या वातावरणाशी सहज जुळवून घेता यावे, यासाठी पहिल्या आठवड्यात शाळेची वेळ कमी ठेवण्यात आल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली.

add
अली पब्लिक स्कूलमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सहशालेय व अभ्यासेतर उपक्रमांवर विशेष भर दिला जातो. शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय आणि आनंददायी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नवीन शैक्षणिक वर्षातही गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम संस्कार आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शाळा सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top