Mahabreaking

[breaking_news]

Thieves on the: साखरखेर्डा परिसरात चोरट्यांचा हैदोस; दिवसाढवळ्या घरफोड्या, दोघे पोलिसांच्या ताब्यात

Thieves on the: साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सवडद आणि पिंपळगाव सोनारा येथे दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे. २० ऑगस्ट रोजी या घटना उघडकीस आल्या. सवडद येथील घटनेप्रकरणी संशयित दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पिंपळगाव सोनारा व हिवरा आश्रम येथील चोरीचे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Spree

 घरफोड्यांनी उडवली नागरिकांची झोप; लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सवडद आणि पिंपळगाव सोनारा येथे दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची माहिती आहे. २० ऑगस्ट रोजी या घटना उघडकीस आल्या. सवडद येथील घटनेप्रकरणी संशयित दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पिंपळगाव सोनारा व हिवरा आश्रम येथील चोरीचे संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

सवडद येथील श्रीकृष्ण अण्णाराव देशमुख यांच्या आई सुनंदाबाई घराला कुलूप लावून मुलांना अंगणवाडीत घेऊन गेल्या होत्या. परत आल्यानंतर घराचे कुलूप उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील कपाट तपासले असता कानातील सोन्याच्या बाळ्या, सेवनपीस, गहू पोत आदी सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने, किंमत अंदाजे सहा लाख रुपये, तसेच ३० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे आढळले.

दरम्यान, गावात भिक्षा मागण्यासाठी फिरणारा राज शेनफड शिंदे हा घरातून बाहेर पडताना पाच वर्षीय गौरी या चिमुकलीने पाहिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर गावातील काही युवकांनी राज शेनफड शिंदे आणि त्याची पत्नी राधा यांचा शोध घेतला असता ते गुंजमाथा शिवारात आढळून आले. युवकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिलेली नसल्याचे सांगण्यात आले.

पिंपळगाव सोनारा येथे कडूबा पुंजाजी कुऱ्हाडे यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दोन दुचाकीस्वारांनी कुलूप तोडून कपाटातील २० हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना घडली. तसेच हिवरा आश्रम येथील शिवाजी हिम्मतराव दळवी यांच्या घराचे कुलूप बंद असताना तीन दुचाकीस्वारांनी ५० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती आहे. या दोन्ही घटनांतील संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

दरम्यान, कोराडी प्रकल्पातील दहा मोटारींच्या तांब्याच्या तारा चोरीला गेल्याचीही माहिती समोर आली आहे. साखरखेर्डा परिसरात गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे दुय्यम ठाणेदार संदीप मेधने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपुरे मनुष्यबळ असल्याने तपासात अडचणी येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामुळे परिसरातील पोलिसी गस्त आणि गुन्हे प्रतिबंधक यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची मागणी होत आहे.

सवडद येथील चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेला संशयित राज शेनफड शिंदे हा शेनफड शिंदे नावाच्या कुख्यात गुन्हेगाराचा भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, यापूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनांचाही तातडीने छडा लावण्याची मागणी होत आहे.

या घटनांबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता तपास सुरू असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top