Mahabreaking

[breaking_news]

police motorcycle rally: तिरंग्यासोबत नशामुक्तीचा संदेश; बोरगाव मंजूत पोलिसांची मोटारसायकल रॅली

police motorcycle rally: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभक्तीचा संदेश देत बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देशभक्तीबरोबरच नशामुक्त जीवन आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.

 independent day

  ‘हेल्मेट वापरा, नशेपासून दूर राहा’; बोरगाव मंजूत पोलिसांची जनजागृती

बोरगाव मंजू : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभक्तीचा संदेश देत बोरगाव मंजू पोलिस प्रशासनाच्या वतीने तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांना देशभक्तीबरोबरच नशामुक्त जीवन आणि रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.

अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन उडान’अंतर्गत ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी दुचाकीस्वारांनी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा, तसेच अमली पदार्थ व व्यसनांपासून दूर राहून नशामुक्त जीवन जगावे, असे आवाहन केले.

दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढत असून, अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यास जीवितहानी किंवा कायमचे अपंगत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेसाठी प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही काळाची गरज आहे, असे ठाणेदार वानखडे यांनी सांगितले.

हेल्मेट हे अपघाताच्या वेळी डोक्याला होणारा आघात कमी करून मेंदूला होणाऱ्या गंभीर दुखापतीपासून संरक्षण करते. तसेच डोके, चेहरा आणि डोळ्यांचेही संरक्षण होते. त्यामुळे दुचाकी चालविताना वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा नियमित वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले.

या मोटारसायकल रॅलीत बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान ‘हेल्मेट वापरा’, ‘नशामुक्त जीवन जगा’ तसेच ‘वाहतूक नियमांचे पालन करा’ अशा संदेशांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top