Mahabreaking

[breaking_news]

Independence Day: बाबुराव पाटील विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थी अनिकेत जाग्रृतचा गौरव

Independence Day: डोणगाव येथून जवळच असलेल्या लोणी गवळी येथील देशभक्त श्री. हि. सो. उर्फ बाबुराव पाटील विद्यालयात १५ ऑगस्ट रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Independence Day

   स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात गुणवंतांचा सन्मान; बाबुराव पाटील विद्यालयात देशभक्तीचा जागर

डोणगाव : डोणगाव येथून जवळच असलेल्या लोणी गवळी येथील देशभक्त श्री. हि. सो. उर्फ बाबुराव पाटील विद्यालयात १५ ऑगस्ट रोजी भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष भास्कर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ध्वजप्रणाम, ‘वंदे मातरम्’ आणि राज्यगीताचे गायन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्ती व कॉपीमुक्ती अभियानाची सामूहिक शपथ देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी आकर्षक संगीत कवायतींचे प्रात्यक्षिक सादर केले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोणी गवळीचे माजी पोलीस पाटील तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे सासरे स्व. रमेश श्रीपतराव पाटील यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भास्कर पाटील होते.

प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव ॲड. अरविंदराव पाटील, पोलीस पाटील प्रशांत पाटील, मुख्याध्यापक सुरेश हिवरकर, संचालक संपतराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद जाग्रृत, माजी सैनिक तुकाराम टाकळकर, दिलीप गवई, रणजित पाटील, संदीप पाटील, सचिन जाधव व सखाराम काळदाते आदी मान्यवर उपस्थित होते.

स्व. रमेश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गं. भा. लिलाबाई रमेश पाटील यांच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी अनिकेत संदीप जाग्रृत याचा मान्यवरांच्या हस्ते १ हजार रुपये रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक नागरिक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार पी. पी. वानखेडे यांनी मानले. या सोहळ्याला गावातील पालक, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top