Mahabreaking

[breaking_news]

Young man attacked: माझ्याकडे पाहून का हसलास? म्हणत लोखंडी रॉडने तरुणावर हल्ला; जीवे मारण्याची धमकी

Young man attacked: तालुक्यातील सावखेड भोई येथे ‘माझ्याकडे पाहून का हसलास?’ या क्षुल्लक कारणावरून एका २१ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी शिवाजी वसंता वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Attempt to outrage

देऊळगाव राजा : तालुक्यातील सावखेड भोई येथे ‘माझ्याकडे पाहून का हसलास?’ या क्षुल्लक कारणावरून एका २१ वर्षीय तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी शिवाजी वसंता वाघमारे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर रमेश वाघमारे (वय २१, रा. सावखेड भोई) हा १५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १२ वाजता घराबाहेर मोबाईलवर बोलत होता. त्यावेळी आरोपी शिवाजी वसंता वाघमारे तेथे आला. ‘तू माझ्याकडे पाहून का हसलास?’ असे म्हणत त्याने शंकर याच्याशी वाद घातला.

वाद वाढल्यानंतर आरोपीने हातातील लोखंडी रॉडने शंकरच्या डोक्याच्या मागील बाजूस तसेच डाव्या हाताच्या दंडावर मारहाण केली. या हल्ल्यात शंकर जखमी झाला. एवढ्यावरच न थांबता आरोपीने शिवीगाळ करून ‘तुला एखाद्या दिवशी जीवाने मारून टाकीन’, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

हल्ल्यानंतर फिर्यादीने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. तोंडी रिपोर्ट तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात ई-साक्षही नोंदविण्यात आली असून त्याचा SID क्रमांक 6563828827601236 असा आहे.

गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड यांनी केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top