Mahabreaking

[breaking_news]

Kamaltai Budhwat honoured :कमलताई बुधवत  ‘लोकमत वूमन अचिव्हर्स अवॉर्ड’ने सन्मानीत

Kamaltai Budhwat honoured :कोरोना महामारीच्या कठीण काळात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य बजावल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा माजी उपाध्यक्ष सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांना  ‘लोकमत वूमन अचिव्हर्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

Kamaltai Budhwat

ग्रामीण आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; कोरोना काळातील उल्लेखनीय कार्याची दखल

पंडीत सावळे

मासरुळ : कोरोना महामारीच्या कठीण काळात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य बजावल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा माजी उपाध्यक्ष सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांना  ‘लोकमत वूमन अचिव्हर्स अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले.

kamaltai

अकोला येथील व्ही. एस. इम्पेरियलच्या सभागृहात १२ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी सौ. कमलताई बुधवत यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे, जनजागृती करणे तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात त्यांनी योगदान दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘लोकमत वूमन अचिव्हर्स अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार सोहळ्यास कारंजा-लाडचे आमदार सई डहाके, अकोल्याच्या महापौर शारदा खेडकर, महाबीज अकोलाचे महासंचालक तथा आयएएस अधिकारी दिलीप स्वामी, सिनेअभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

कमलताई बुधवत यांच्या सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top