Mahabreaking

[breaking_news]

MDS Icon :नंदकिशोर ढाकरे व मो. परवेज मो. लईक यांना ‘एमडीएस आयकॉन २०२६’ पुरस्कार

MDS Icon : ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘एमडीएस आयकॉन २०२६’ पुरस्काराने अकोला येथील विदर्भ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक नंदकिशोर ढाकरे आणि समीर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मो. परवेज मो. लईक यांना नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

MDS Icon

अकोल्याच्या दोन ड्रायव्हिंग स्कूल संचालकांचा नागपुरात राष्ट्रीय अधिवेशनात गौरव

आगाखान पठाण

अकोला : ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘एमडीएस आयकॉन २०२६’ पुरस्काराने अकोला येथील विदर्भ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक नंदकिशोर ढाकरे आणि समीर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मो. परवेज मो. लईक यांना नागपूर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनादरम्यान ड्रायव्हिंग प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या देशभरातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये अकोल्यातील नंदकिशोर ढाकरे आणि मो. परवेज मो. लईक यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गिरीश शर्मा, सचिव मुरलीधरन, महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार दुग्गल तसेच महासचिव सोपानराव ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

ड्रायव्हिंग प्रशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी तसेच संघटनेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. अकोला येथील दोन्ही ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचे मानले जात आहे.

ढाकरे आणि परवेज यांच्या सन्मानाबद्दल अकोला जिल्ह्यातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल क्षेत्रातील पदाधिकारी, संचालक, प्रशिक्षक तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top