Speeding scooter : भरधाव व निष्काळजीपणे स्कुटी चालवून पादचाऱ्याला धडक दिल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी देऊळगाव मही येथील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात ५८ वर्षीय मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

निष्काळजी वाहनचालकावर कारवाई; धडकेत मजूर गंभीर जखमी
गजानन तिडके
देऊळगाव राजा : भरधाव व निष्काळजीपणे स्कुटी चालवून पादचाऱ्याला धडक दिल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी देऊळगाव मही येथील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात ५८ वर्षीय मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख अयास शेख निजाम (वय ५८, व्यवसाय – मजुरी, रा. देऊळगाव मही) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरुण बबनराव जायभाये (रा. देऊळगाव मही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान देऊळगाव मही येथे आरोपीने त्याच्या ताब्यातील स्कुटी भरधाव व निष्काळजीपणे चालवत फिर्यादी शेख अयास शेख निजाम यांना जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांच्या डाव्या पायाला व गुडघ्याला गंभीर दुखापत झाली.
जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून वैद्यकीय प्रमाणपत्र (एमएलसी) तसेच फिर्यादीच्या तोंडी जबाबाच्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५७/२०२६ नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१ व १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत.

