Mahabreaking

[breaking_news]

Drunken driving horror :दारूच्या नशेत भरधाव कारचा थरार; बॅरिकेड फोडत वाहनाला व गायीला धडक

Drunken driving horror : दारूच्या नशेत भरधाव व निष्काळजीपणे कार चालवत दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक देत रस्त्यावरील बॅरिकेड उडवून गायीला धडक दिल्याची घटना देऊळगाव राजा येथील कुंभारी बायपासवर शनिवारी (१ ऑगस्ट) रात्री घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी गुजरातमधील दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Drunken driving horror
देऊळगाव राजा बायपासवर भीषण अपघात; मद्यधुंद चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : दारूच्या नशेत भरधाव व निष्काळजीपणे कार चालवत दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक देत रस्त्यावरील बॅरिकेड उडवून गायीला धडक दिल्याची घटना देऊळगाव राजा येथील कुंभारी बायपासवर शनिवारी (१ ऑगस्ट) रात्री घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी गुजरातमधील दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरभद्रसिंग जामतसिंग चौहान (वय २२) व रघुनाथसिंग भगवतसिंग चौहान (वय २३, दोघेही रा. मोटा कोठासना, ता. सतलासना, जि. महेसाणा, गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी पोलीस शिपाई विनोद केशव चव्हाण (पोलीस स्टेशन देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास कुंभारी बायपास येथे आरोपी त्यांच्या ताब्यातील यूपी-१४-क्यूटी-५३०४ क्रमांकाची कार मद्यधुंद अवस्थेत आळीपाळीने भरधाव व निष्काळजीपणे चालवत होते. यावेळी कारने एमएच-२८-एझेड-४७५३ क्रमांकाच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत संबंधित वाहनाचे नुकसान झाले.
यानंतर भरधाव कारने रस्त्यावरील बॅरिकेडला धडक देत ते उडविले आणि पुढे एका गायीला धडक दिल्याने तिचेही नुकसान झाले. या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८५ (मद्यप्राशन करून वाहन चालविणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक फौजदार निलीमा जाधव यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top