Jijau Technical College : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी जाहीर केलेल्या शैक्षणिक वर्ष २०२५ च्या निकालात जिजाऊ टेक्निकल कॉलेज, देऊळगाव राजा यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम – बांधकाम पर्यवेक्षक (Construction Supervisor) या अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थी यशस्वी झाले असून परिसरात महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

शहनाज सय्यद प्रथम, केशव सवडे द्वितीय, शुभम मांदळे तृतीय; अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी जाहीर केलेल्या शैक्षणिक वर्ष २०२५ च्या निकालात जिजाऊ टेक्निकल कॉलेज, देऊळगाव राजा यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम – बांधकाम पर्यवेक्षक (Construction Supervisor) या अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थी यशस्वी झाले असून परिसरात महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या निकालात कु. शहनाज ताहेर सय्यद यांनी प्रथम क्रमांक पटकावत महाविद्यालयात अव्वल येण्याचा मान मिळविला. केशव सुभाष सवडे यांनी द्वितीय, तर शुभम जालिंदर मांदळे यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
याशिवाय पवन मधुकर कुटे (७६ टक्के), चेतन शिवहरी टेकाळे (७५.४३ टक्के), उज्ज्वल वसंतराव देशमुख (७५.२९ टक्के), राधेश्याम विष्णू भगस (७५ टक्के) आणि गोपाल राजेशराव देशमुख (७४ टक्के) यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले. इतर सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत महाविद्यालयाच्या शतप्रतिशत निकालात मोलाची भर घातली.
महाविद्यालयात सुरू असलेला बांधकाम पर्यवेक्षक हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मानला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये सरळ सेवा भरतीद्वारे नोकरीची संधी उपलब्ध होते. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी बांधकाम क्षेत्र तसेच शासकीय कंत्राटदार किंवा ठेकेदार म्हणून परवाना मिळविण्याची संधीही विद्यार्थ्यांना प्राप्त होते.
या उल्लेखनीय निकालाबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अनंतकुमार देशमुख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिजाऊ टेक्निकल कॉलेजने सातत्याने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत कौशल्याधारित शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला असून, या यशाबद्दल विद्यार्थी, पालक आणि परिसरातून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

