Mahabreaking

[breaking_news]

Assault over dispute: उसन्या पैशांच्या वादातून मारहाण; देऊळगाव राजात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Assault over dispute: उसन्या पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १७ जुलै रोजी दुपारी अमेन अजीज मशिदीसमोरील रस्त्यावर घडली.

ciber

   नमाजवरून परतताना वाद; शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी

गजानन तिडके

देऊळगाव राजा : उसन्या पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १७ जुलै रोजी दुपारी अमेन अजीज मशिदीसमोरील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी महमंद तौफीक महमद रफीक (वय ४६, रा. कबाडपुरा, देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा क्रमांक ३२६/२०२६ कलम २९६, ११५(२), ३५१(२), ३५१(३) व ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्यांचे वडील व इतर साक्षीदार नमाज अदा करून घरी जात असताना अमेन अजीज मशिदीसमोरील रस्त्यावर आरोपी सय्यद रौफ, सय्यद जावेद सय्यद रौफ, सय्यद जाकीर सय्यद रौफ आणि सय्यद शाकीर सय्यद रौफ (सर्व रा. अमूतनगर, देऊळगाव राजा) हे तेथे आले.

फिर्यादीनुसार, आरोपी सय्यद रौफ यांनी फिर्यादीच्या वडिलांना “मी तुमचे पैसे देणार नाही, तुमच्याकडून काय होते ते करा,” असे म्हणत आर्थिक व्यवहारावरून वाद घातला. त्यानंतर आरोपीने कथितरीत्या अश्लील भाषेत शिवीगाळ केली. फिर्यादी व त्यांचे भाऊ वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत असताना उर्वरित आरोपींनी त्यांना चापटाबुक्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा पैशांची मागणी केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार नायबराव मोगल करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top