Mahabreaking

[breaking_news]

Avinash Pohare : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पातूर तालुका उपाध्यक्षपदी अविनाश पोहरे यांची निवड

Avinash Pohare : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पातूर तालुका कार्यकारिणीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोहरे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि युवक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Avinash Pohare

 सामाजिक कार्याची दखल; अविनाश पोहरे यांच्यावर तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी

निशांत गवई

पातूर : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या पातूर तालुका कार्यकारिणीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोहरे यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि युवक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.

add

अविनाश पोहरे हे गेल्या १० ते १२ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृती क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजसेवेची आवड जोपासत त्यांनी विविध शासकीय जनजागृती अभियानांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.

त्यांनी ग्रामीण भागात मोफत स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती आणि सैन्य भरतीसंदर्भातील मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन करून अनेक युवकांना दिशा देण्याचे काम केले आहे. याशिवाय, २०२५ मध्ये “एक पेड माँ के नाम” या वृक्षारोपण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. विविध महापुरुषांच्या जयंती मिरवणुकांदरम्यान पोलीस प्रशासनासोबत बंदोबस्ताच्या कामात स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवून त्यांनी समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने त्यांच्यावर तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

निवडीनंतर अविनाश पोहरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानत, युवकांना संघटित करून समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच युवकांमध्ये कायद्याबाबत जनजागृती, सामाजिक सलोखा आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सहभाग वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक संस्था, युवक मंडळे, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top