Mahabreaking

[breaking_news]

Erratic rainfall : पावसाच्या लहरीपणाने शेतकरी संकटात; बोरगाव मंजू परिसरात दुबार पेरणीची वेळ

Erratic rainfall :  मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अडचणीत सापडलेल्या बोरगाव मंजू परिसरातील शेतकऱ्यांना जुलैच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. त्यानंतर बहुतांश भागात खरीप पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण समाधानकारक न झाल्याने काही शेतकऱ्यांवर फेरपेरणी, तर काहींवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

Erratic rainfall

  कुठे फेरपेरणी, कुठे वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

बोरगाव मंजू : मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अडचणीत सापडलेल्या बोरगाव मंजू परिसरातील शेतकऱ्यांना जुलैच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. त्यानंतर बहुतांश भागात खरीप पेरण्या पूर्ण झाल्या. मात्र, अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण समाधानकारक न झाल्याने काही शेतकऱ्यांवर फेरपेरणी, तर काहींवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.

crop

पेरणीनंतर पुन्हा पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही शेतांमध्ये पिकांची वाढ समाधानकारक दिसत असली तरी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या शेतकरी तणनियंत्रण, मशागत आणि पिकांच्या संगोपनाच्या कामात व्यस्त आहेत. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे उगवण कमी झाल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे काहींच्या पेरण्या पूर्णपणे फसल्या असून त्यांना अतिरिक्त खर्च करून दुबार पेरणी करावी लागली आहे. आधीच वाढत्या शेतीखर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर याचा मोठा परिणाम होत आहे. शेतकऱ्यांच्या मते, खरीप पिकांचे उत्पादन वाचविण्यासाठी आगामी काळात दमदार आणि सलग पावसाची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाच्या आगमनाकडे लागले आहे.

पावसाच्या अनिश्चिततेबरोबरच वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळेही शेतकरी त्रस्त झाले आहेत. नव्याने उगवलेल्या पिकांचे वन्य प्राण्यांकडून नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

आधीच अपुरा पाऊस, नैसर्गिक संकटे, निकृष्ट बियाणे, वाढता शेतीखर्च, पिकविमा व बाजारपेठेतील अडचणी अशा अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वन्य प्राण्यांचा उपद्रव ही आणखी एक मोठी समस्या ठरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबरोबरच दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि आवश्यक कृषी सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top