Mahabreaking

[breaking_news]

Anurag Sarode: राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पातूरच्या अनुराग सरोदेचा प्रथम क्रमांक

Anurag Sarode: संभाजीनगर येथे ५ जुलै २०२६ रोजी जी चॅम्प अबॅकसतर्फे आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अनुराग सतीश सरोदे याने प्रथम क्रमांक पटकावून पातूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

Anurag Sarode

 अनुराग सरोदेची राज्यात चमक; अबॅकस स्पर्धेत पटकावला अव्वल मान

निशांत गवई

पातूर  : संभाजीनगर येथे ५ जुलै २०२६ रोजी जी चॅम्प अबॅकसतर्फे आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा विद्यार्थी अनुराग सतीश सरोदे याने प्रथम क्रमांक पटकावून पातूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

Add

स्पर्धेतील उल्लेखनीय यशानंतर संभाजीनगर येथील एम.आय.टी. मंथन हॉल येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते अनुरागचा प्रशस्तीपत्र, मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. राज्यभरातील विद्यार्थ्यांमधून अव्वल स्थान मिळवत अनुरागने आपल्या बुद्धिमत्ता, मेहनत आणि सातत्यपूर्ण सरावाची छाप उमटवली.

अबॅकस ही विद्यार्थ्यांच्या गणिती क्षमतेसोबतच स्मरणशक्ती, एकाग्रता, वेग आणि बुद्धिमत्तेची कसोटी पाहणारी स्पर्धा मानली जाते. अशा स्पर्धेत अनुरागने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे पातूर शहरासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाचे श्रेय अनुरागने शिक्षिका मिताली काळपांडे, विलास काळपांडे, तसेच आपल्या आई-वडील, बहीण आणि गुरूजनांना दिले आहे. अनुरागच्या या यशामुळे पातूरच्या शैक्षणिक क्षेत्रालाही नवे बळ मिळाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top