Mahabreaking

[breaking_news]

Major action: खदान पोलिसांची मोठी कारवाई; २.३३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Major action: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात साठवून त्याची विक्री करणाऱ्या एका इसमावर खदान पोलिसांनी कारवाई करत २ लाख ३३ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Major action

 अकोल्यात घरात साठवलेला गुटखा पकडला; एका आरोपीवर गुन्हा दाखल

संजय तायडे 

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात साठवून त्याची विक्री करणाऱ्या एका इसमावर खदान पोलिसांनी कारवाई करत २ लाख ३३ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ६ जुलै) खदान पोलीस ठाणे, अकोला येथे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, खदान परिसरातील एक इसम स्वतःच्या घरात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री करीत आहे.

या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाहरी वनवे, खदान पोलीस ठाण्याचे डीबी पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन शासकीय पंचांसमक्ष प्रेमप्रकाश आश्रमजवळील सिंधी कॅम्प परिसरातील कच्ची खोली येथे छापा टाकला.

या कारवाईदरम्यान आरोपी गुलशन मनोहरलाल दुलानी (वय ४०) याच्या घरातून शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण विक्री किंमत २,३३,४९० रुपये इतकी आहे.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७४, २७५, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या अधिसूचना व आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित कायद्यांनुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक Archit Chandak, अपर पोलीस अधीक्षक Chandrakant Reddy, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दादाहरी वनवे, गिरीश वीर, संदीप काटकर, राजेश वानखडे, स्वप्नील वानखडे, निलेश बढे, विकांत अंभोरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल आस्मा अयुब अली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top