Mahabreaking

[breaking_news]

Speeding Nexon rams :जाफराबाद चौफुलीवर भरधाव नेकसॉनची बलेनोला धडक; चालक जखमी, गुन्हा दाखल

Speeding Nexon rams : शहरातील जाफराबाद चौफुली परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात भरधाव वेगाने आलेल्या नेकसॉन कारने बलेनो कारला जोरदार धडक दिल्याने बलेनो चालक जखमी झाला असून वाहनाचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात नेकसॉन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Speeding Nexon rams

 देऊळगाव राजा येथे चौफुलीवर अपघात; निष्काळजी वाहनचालकाविरोधात पोलिसांत गुन्हा

गजानन तिडके 

 देऊळगाव राजा : शहरातील जाफराबाद चौफुली परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात भरधाव वेगाने आलेल्या नेकसॉन कारने बलेनो कारला जोरदार धडक दिल्याने बलेनो चालक जखमी झाला असून वाहनाचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात नेकसॉन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इस्माईल अब्दुल गफूर (वय 51, रा. जलालपुरा, खामगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बुधवार, दि. 1 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या ताब्यातील बलेनो कार (क्र. एमएच 28 बीक्यू 5726) घेऊन चौफुलीवरून चिखलीकडून जालन्याकडे जाणारा रस्ता ओलांडत होते. समोरील रस्त्यावर वाहन अर्धवट गेले असताना जालन्याकडून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या नेकसॉन कारने (क्र. एमएच 21 सीजी 1894) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, नेकसॉन कारचा चालक वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. या धडकेत बलेनो कारच्या समोरील डाव्या दरवाजाजवळ जोरदार ठोकर बसली. अपघातात कारचे नुकसान झाले असून शेख इस्माईल हे जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर शेख इस्माईल यांच्या तोंडी फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अप क्रमांक 300/2026 नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 281, 125(अ), 324(4) अन्वये नेकसॉन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद एएआय नारायण गिते यांनी केली असून पुढील तपास पोहेका भास्कर सानप करीत आहेत. अपघाताचे नेमके कारण, वाहनाचा वेग, चौफुलीवरील वाहतूक परिस्थिती आणि चालकाची जबाबदारी याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top