Mahabreaking

[breaking_news]

Chief Executive Officer: मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात चिमुकल्यांमध्ये रमले; चांडोळ जि.प. शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात

Chief Executive Officer: बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील जिल्हा परिषद समूह साधन केंद्र शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेला प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी प्रमुख उपस्थिती लावून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. चिमुकल्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी गप्पा मारत त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने इतक्या साधेपणाने विद्यार्थ्यांमध्ये मिसळून संवाद साधल्याने मुलांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Chief Executive Officer

  ‘आदर्श शाळे’त जल्लोषात प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांशी सीईओ गुलाबराव खरात यांचा मनमोकळा संवाद

बबन फेपाळे

रुईखेड मायंबा : बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील जिल्हा परिषद समूह साधन केंद्र शाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेला प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी प्रमुख उपस्थिती लावून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. चिमुकल्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी गप्पा मारत त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने इतक्या साधेपणाने विद्यार्थ्यांमध्ये मिसळून संवाद साधल्याने मुलांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्या हस्ते इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. स्काऊट-गाईड व लेझीम पथकाच्या साथीने प्रभात फेरी काढण्यात आली. रंगीबेरंगी फुगे, आकर्षक तोरणे, स्वागत फलक आणि विविध सजावटीमुळे संपूर्ण शाळा परिसर उत्साहाने फुलून गेला होता. नवागत विद्यार्थ्यांच्या पायांना कुंकू-पाणी लावून त्यांच्या पावलांचे ठसे कागदावर घेण्याचा अभिनव उपक्रमही यावेळी राबविण्यात आला.

शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांनी शाळेतील परसबाग, क्रीडांगण, ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच शाळेतील स्वच्छता, रंगरंगोटी आणि आनंददायी शैक्षणिक वातावरणाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

इयत्ता पहिलीत तब्बल ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याबद्दल त्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे विशेष कौतुक केले. शाळेची सातत्याने वाढणारी पटसंख्या, विविध स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांचे यश, शैक्षणिक गुणवत्ता तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचे सहकार्य अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

नुकतीच शासनाने या शाळेची ‘आदर्श शाळा’ म्हणून निवड केल्याचा उल्लेख करत, भविष्यातही शाळेची अशीच सर्वांगीण प्रगती होत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. शासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन देत ग्रामस्थांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक सचिन ताटू यांनी शाळेची वाढती पटसंख्या, पालकांचा सहभाग, शिक्षकांचे कार्य तसेच शाळेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.यावेळी गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले, चांडोळचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, पत्रकार, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top