Mahabreaking

[breaking_news]

Nilesh Tambe :मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना दूर ठेवा’; नीलेश तांबे यांचे आवाहन

Nilesh Tambe : मासरूळजवळील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, सोयगाव (ता. जि. बुलढाणा) येथे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे आणि पालकांमध्ये शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने ३० जून २०२६ रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Nilesh Tambe

नवागतांचे स्वागत, पुस्तक वाटप व वृक्षारोपणाने सोयगाव जिल्हा परिषद शाळेचा प्रवेशोत्सव जल्लोषात

पंडीत सावळे

मासरूळ : मासरूळजवळील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, सोयगाव (ता. जि. बुलढाणा) येथे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे आणि पालकांमध्ये शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने ३० जून २०२६ रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिल देवकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, ‘शाळेत पहिले पाऊल’ उपक्रम, गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक आणि समाज यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

आजच्या डिजिटल युगात नवीन ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असले, तरी मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना दूर ठेवणे ही पालकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुलं मोबाईलवर कोणत्या प्रकारचा मजकूर पाहतात, याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमानंतर त्यांनी शाळेच्या परिसराची तसेच शौचालय, संगणक प्रयोगशाळा, वाचनालय आणि मध्यान्ह भोजन योजनेसह विविध सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा भरत बुधवत, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नेवरे, सरपंच गीताबाई राजाराम पिंपळे, उपसरपंच रमेश तायडे, माजी सरपंच समाधान बुधवत, शिवहरी मांटे, राजाराम पिंपळे, भरत बुधवत, रंगनाथ बुधवत, शाहीर जगन्नाथ बुधवत, देविदास जाधव, रामेश्वर बुधवत, परमेश्वर नेवरे, गणेश बुधवत, धाड पोलीस ठाण्याचे एपीआय मोरे, ग्रामसेवक दराखे, ईश्वर वाघ यांच्यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश इंगळे यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश पळसकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नागोराव उबरहंडे, लता पालीवाल, संतोष चवंड आणि प्रमोद पडोळ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top