Mahabreaking

[breaking_news]

Deepak Pawar appointed :दीपक पवार यांची युवासेना विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

Deepak Pawar appointed : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी दीपक पवार यांची युवासेना विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या सूचनेनुसार तसेच ऋषीभाऊ जाधव आणि श्रीनिवास खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Deepak Pawar appointed

माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या हस्ते सत्कार

गजानन तिडके

देऊळगाव राजा  : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला बळ देण्यासाठी दीपक पवार यांची युवासेना विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या सूचनेनुसार तसेच ऋषीभाऊ जाधव आणि श्रीनिवास खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नियुक्तीनंतर देऊळगाव राजा येथील माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदारांच्या हस्ते दीपक पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आगामी काळात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत करून युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास युवासेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात, तालुकाप्रमुख सुदाम काकड, युवासेना शहरप्रमुख अतिश खरात, अमरावती विभाग सोशल मीडिया प्रमुख सचिन व्यास, शिवसेना उपशहरप्रमुख राजेश सपाटे, बद्री दंदाले, गोपाल वायाळ, गोपाल खेडेकर, सूरज खेडेकर, कैलास मोरे आणि आनंद आटोळे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

नियुक्तीबद्दल उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दीपक पवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्ष संघटन विस्ताराच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top