Mahabreaking

[breaking_news]

Tazia procession :बाळापूरची ऐतिहासिक ताजिया मिरवणूक शांततेत संपन्न; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुन्हा दर्शन

Tazia procession : विदर्भभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी बाळापूर येथील मोहर्रमची ऐतिहासिक ताजिया मिरवणूक यंदाही अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि धार्मिक उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या सोहळ्याच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन पुन्हा एकदा घडले.

Tazia procession

विदर्भाची मानाची ताजिया मिरवणूक उत्साहात; कडेकोट पोलीस बंदोबस्तात मोहर्रम सोहळा निर्विघ्न

बाळापूर : विदर्भभर आपली वेगळी ओळख निर्माण करणारी बाळापूर येथील मोहर्रमची ऐतिहासिक ताजिया मिरवणूक यंदाही अत्यंत शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि धार्मिक उत्साहाच्या वातावरणात पार पडली. या सोहळ्याच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन पुन्हा एकदा घडले.

add

दुपारी ३ वाजता शहरातील सर्व ताजिये आणि मोहर्रमचे जुलूस दरगाह चौकात एकत्र आले. त्यानंतर अंजुमन स्कूल रोड, रंगाहट्टी, जुने शासकीय रुग्णालय, जैन मंदिर मार्गे पारंपरिक मार्गक्रमण करत मिरवणूक कर्बला मैदानात पोहोचली. तेथे धार्मिक परंपरा आणि विधीनुसार ताजियांचे विसर्जन करण्यात आले.

अंजुमन स्कूल रोड परिसरात नायब तहसीलदार, ताजिया मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी तसेच ढोल-ताशा पथकांचे पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यात हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्य, परस्पर विश्वास आणि बंधुभावाचा संदेश दिला.

यावेळी शांतता समितीचे अध्यक्ष बाबूसाहेब मांडेवाले, माजी नगराध्यक्ष जम्मू सेठ, किशोर सेठ, माजी नगरसेवक डॉ. मो. फैयाज अन्सारी, रईस कुरेशी, एजाज हुसेन, मो. फहीम, नगरसेवक मो. अकरम, शांतता समिती सदस्य आसिफ शाह, आरिफ अरमानी, मो. इरफान सेठ यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच हिंदू-मुस्लिम समाजातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

add

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी माजी पोलीस निरीक्षक अनिल जुमळे तसेच पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपनिरीक्षक शरद सैंदाणे, विनोद खाडे, वैशाली पाटील, रवि राऊत यांच्यासह सुमारे ६०० पोलीस कर्मचारी आणि १०० होमगार्ड संपूर्ण मिरवणुकीदरम्यान सतर्कपणे बंदोबस्तावर कार्यरत होते.

पोलीस प्रशासनाची दक्षता, विविध ताजिया मंडळांचे सहकार्य आणि नागरिकांच्या जबाबदार सहभागामुळे यंदाचा मोहर्रम उत्सव कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत आणि उत्साहात पार पडला. त्यामुळे बाळापूरने पुन्हा एकदा गंगा-जमुनी संस्कृती, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय ऐक्याचा आदर्श संपूर्ण विदर्भासमोर उभा केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top