Mahabreaking

[breaking_news]

Sholay-style protest :जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांचा शोले स्टाईल एल्गार

Sholay-style protest : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या व रखडलेल्या कामाविरोधात देऊळगाव मही येथील ग्रामस्थांनी सोमवारी ‘शोले स्टाईल’ आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. भर पावसाळ्यातही गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत संबंधित विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Sholay-style

सात दिवसांची मुदत संपली, तरी काम नाही;  लेखी आश्वासनानंतर माघार

विठ्ठल पान्नासे

देऊळगाव मही : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या व रखडलेल्या कामाविरोधात देऊळगाव मही येथील ग्रामस्थांनी सोमवारी ‘शोले स्टाईल’ आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. भर पावसाळ्यातही गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत संबंधित विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

add

सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ग्रामपंचायत सदस्य आनंथा इगळे, संदीप राऊत, कारभारी देढे, सागर रोतळे आणि हरी शिंदे यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान जलजीवन मिशनच्या कामातील दिरंगाई, निकृष्ट दर्जा आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, यापूर्वी संबंधित विभागाला सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्या कालावधीत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता श्रद्धा बनकर, आकाश कचरे आणि भूषण आडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी २ जुलैपासून अपूर्ण काम पुन्हा सुरू करून पाण्याच्या टाकीपासून बसस्थानक चौकापर्यंतचा उर्वरित भाग निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी ग्रामविकास अधिकारी वसंतराव चेके, सरपंच पती वसुदेव शिंगणे, माजी सरपंच रामा मस्के, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे शेख जुल्फेकार, पुरुषोत्तम (काका) शिंगणे, फराद शेठ, गणेश शिंगणे, निशांत देशमुख, प्रमोद शिंगणे, निखील शिंगणे, गौरव सोनसळे, प्रशांत शिंगणे, लक्ष्मण शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या आंदोलनामुळे जलजीवन मिशनच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि अंमलबजावणीतील दिरंगाईवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, दिलेल्या लेखी आश्वासनानुसार काम वेळेत पूर्ण होते की नाही, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top