Mahabreaking

[breaking_news]

Soil fertility maps :पंदेकृवीतर्फे १८ ब्लॉकचे मृदा सुपीकता नकाशे तयार; कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते हस्तांतरण

Soil fertility maps : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प, मृदा विज्ञान विभागामार्फत मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र (वणी-रंभापूर) अंतर्गत सर्व १८ ब्लॉकसाठी तयार करण्यात आलेले मृदा सुपीकता दर्शक नकाशे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते प्रक्षेत्र प्रमुख तथा मुख्य बीज उत्पादन अधिकारी डॉ. शिवाजी नागपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. हा कार्यक्रम २५ जून २०२६ रोजी मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रातील अन्वी ब्लॉक येथे आयोजित करण्यात आला.

Soil fertility maps
मृदा सुपीकतेचा वैज्ञानिक आराखडा तयार; पीकनिहाय खत व्यवस्थापनासाठी नवे मार्गदर्शन

संजय तायडे 

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्प, मृदा विज्ञान विभागामार्फत मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्र (वणी-रंभापूर) अंतर्गत सर्व १८ ब्लॉकसाठी तयार करण्यात आलेले मृदा सुपीकता दर्शक नकाशे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते प्रक्षेत्र प्रमुख तथा मुख्य बीज उत्पादन अधिकारी डॉ. शिवाजी नागपुरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. हा कार्यक्रम २५ जून २०२६ रोजी मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रातील अन्वी ब्लॉक येथे आयोजित करण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रातील सर्व १८ ब्लॉकमधून अर्धा किलोमीटर ग्रीड पद्धतीने सुमारे ६०० मातीचे नमुने संकलित करण्यात आले. या नमुन्यांचे रासायनिक विश्लेषण करून विविध अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या आधारे प्रत्येक ब्लॉकचा मृदा सुपीकता दर्शक नकाशा तयार करण्यात आला. हे नकाशे भारतीय मृदा अनुसंधान संस्था, भोपाळ यांच्या सहकार्याने तयार करण्यात आले असून त्यासोबत सविस्तर तांत्रिक अहवालही तयार करण्यात आला आहे.
या नकाशांच्या आधारे प्रक्षेत्रातील विविध भागांतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, कमतरता तसेच मृदेची सुपीकता यांचे अचूक मूल्यांकन करता येणार आहे. त्यामुळे पीकनिहाय व क्षेत्रनिहाय संतुलित खत व्यवस्थापनाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार असून शेतकरी व संशोधकांना त्याचा लाभ होणार आहे.
यावेळी प्रक्षेत्र प्रमुख तथा मुख्य बीज उत्पादन अधिकारी डॉ. शिवाजी नागपुरे यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख, अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य प्रकल्पाचे वरिष्ठ मृदशास्त्रज्ञ डॉ. संदीप हाडोळे तसेच कनिष्ठ मृदशास्त्रज्ञ प्रशांत सरप यांनी केलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त केले.
या प्रसंगी कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, प्रभारी अधिकारी डॉ. श्याम घावडे, डॉ. मोरे तसेच विविध ब्लॉकचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top