Mahabreaking

[breaking_news]

Chatari-Sangola route :चतारी-सांगोळा रस्ता की नाला? पावसात विद्यार्थी, चिमुकले आणि नागरिकांचा जीव धोक्यात

Chatari-Sangola route : पातूर तालुक्यातील चतारी–सांगोळा  या प्रमुख मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावरील खड्ड्यांचा अहवाल तयार केला असतानाही दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. परिणामी, पहिल्याच पावसात हा रस्ता अक्षरशः नाल्यात रूपांतरित झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Chatari-Sangola route

प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका; चतारी-सांगोळा मार्गावरील खड्ड्यांनी वाढवला अपघाताचा धोका

 राहुल सोनोने

दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील चतारी–सांगोळा  या प्रमुख मार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावरील खड्ड्यांचा अहवाल तयार केला असतानाही दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. परिणामी, पहिल्याच पावसात हा रस्ता अक्षरशः नाल्यात रूपांतरित झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बाळापूर यांनी रस्त्याची पाहणी करून खड्ड्यांची नोंद केली होती. तसेच रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अलीकडील मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. खड्डे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी रस्ता आणि नाला यामधील फरक ओळखणेही कठीण झाले. त्यामुळे वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

या मार्गावरून दररोज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडीतील चिमुकली मुले, महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. पावसानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जनावरांनाही रस्त्याची दिशा ओळखणे कठीण होत असल्याने परिस्थितीची गंभीरता अधिक वाढली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत चतारीमार्फत मुख्य रस्त्यालगत करण्यात आलेल्या नालीच्या कामामुळेही परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ऑनलाइन नोंदींमध्ये नाली बंदिस्त असल्याचे दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात ती उघडी असल्याचे दिसून येत आहे. शिवाय नाली खोदकामातून निघालेली माती व मुरूम रस्त्याच्या कडेला टाकल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी पावसाचे पाणी नाल्यात न जाता थेट रस्त्यावरून वाहत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

उघडी नाली, पाण्याने भरलेले खड्डे आणि अरुंद झालेला रस्ता यामुळे एखादा विद्यार्थी किंवा अंगणवाडीतील चिमुकला घसरून पडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top