District Collector visits :पातूर तहसीलअंतर्गत येणाऱ्या बाभूळगाव येथे अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी (दि. २४ जून) भेट देऊन हवामान मापक केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणेची माहिती घेत विविध बाबींचा आढावा घेतला.

बाभूळगावातील विविध शासकीय सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी; अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना
राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तहसीलअंतर्गत येणाऱ्या बाभूळगाव येथे अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी (दि. २४ जून) भेट देऊन हवामान मापक केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित यंत्रणेची माहिती घेत विविध बाबींचा आढावा घेतला.
या दौऱ्यादरम्यान पातूरचे तहसीलदार राहुल वानखडे यांनी प्रस्तावित नवीन मंडळ अधिकारी कार्यालयाच्या जागेची पाहणी करून कार्यालयाशी संबंधित समस्या व आवश्यक बाबी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
यावेळी मंडळ अधिकारी शेफाली देशमुख, महसूल अधिकारी वैभवी रौंदळे, विलास गवई, सुनील उखळकर, एस. जी. मिलखे, अनुपमा खरतळे तसेच महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बाभूळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. त्यांनी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), आंतररुग्ण विभाग (आयपीडी), प्रयोगशाळा, प्रसूती कक्ष तसेच इतर विभागांची पाहणी करून उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. आरोग्य केंद्रातील विविध समस्यांची माहितीही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
पाहणीनंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्लाउद्दीन यांच्यासह आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

