Mahabreaking

[breaking_news]

Administration takes: एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाचा पुढाकार; ३० जूनला जिल्हास्तरीय चर्चासत्र

Administration takes: जागतिक एकल महिला दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास विभाग, कृषी समृद्धी मल्टिपर्पज फाउंडेशन आणि आस्था संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून रोजी ‘सखी निवास’ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी संकटांशी सामना करत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या एकल महिलांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

Administration takes

‘एकल महिलांनी धोरण निर्मितीत सहभाग घ्यावा’; अमोल डिघुळे यांचे आवाहन

 बुलढाणा : जागतिक एकल महिला दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास विभाग, कृषी समृद्धी मल्टिपर्पज फाउंडेशन आणि आस्था संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून रोजी ‘सखी निवास’ येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी संकटांशी सामना करत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या एकल महिलांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

यावेळी अमोल डिघुळे यांनी सांगितले की, शासन स्तरावर सध्या एकल महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धोरणात कोणत्या बाबींचा समावेश असावा, यासंदर्भात एकल महिलांनी आपल्या सूचना व अपेक्षा लेखी स्वरूपात प्रशासनाकडे सादर कराव्यात. महिलांच्या सूचना व अनुभवांचा या धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर ३० जून रोजी जिल्हा परिषद, बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात जिल्ह्यातील एकल महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपली मते, समस्या आणि अपेक्षा मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने एकल महिला धोरण तयार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासंदर्भात मिशन वात्सल्य समितीच्या सदस्या आशा सिरसाट यांनी महिलांनी स्वतः पुढे येऊन आपल्या समस्या आणि गरजा मांडणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी मिटकॉनचे जिल्हा समन्वयक कैलास खराटे यांनी एकल महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि कर्ज सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. बँकांशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेषा पवार, रामेश्वर वसू आणि महेंद्र सौभागे यांनीही उपस्थित महिलांना विविध शासकीय योजना, महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक एकल महिला उपस्थित होत्या. शासनाच्या नव्या धोरणाच्या निर्मितीत महिलांचा सहभाग वाढावा आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top