Mahabreaking

[breaking_news]

Congress flag in Patur :पातूरमध्ये काँग्रेसचा झेंडा, पण विरोधकांचीही दमदार मुसंडी; नगरराजकारणात नवे समीकरण

Congress flag in Patur : पातूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निकालाने स्थानिक राजकारणाला नवे वळण दिले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत खान रूम खान (इद्दू पैलवान) यांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपला दावा मजबूत केला असला, तरी या निवडणुकीचा सर्वात मोठा राजकीय संदेश म्हणजे विकास योद्धा मंचचा झालेला प्रभावी उदय मानला जात आहे.

Congress flag in Patur

 इद्दू पैलवान नगराध्यक्षपदी; विकास योद्धा मंचच्या उदयानं पारंपरिक पक्षांची वाढली धडधड

निशांत गवई

पातूर : पातूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या निकालाने स्थानिक राजकारणाला नवे वळण दिले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हिदायत खान रूम खान (इद्दू पैलवान) यांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपला दावा मजबूत केला असला, तरी या निवडणुकीचा सर्वात मोठा राजकीय संदेश म्हणजे विकास योद्धा मंचचा झालेला प्रभावी उदय मानला जात आहे.

add

नगराध्यक्षपदाच्या लढतीत हिदायत खान रूम खान यांना सुमारे सहा हजार 9 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी हाजी सय्यद बुरहान यांना ४,४०८ मते मिळाली. जवळपास दुप्पट मताधिक्याने मिळालेल्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात विजयाचा जल्लोष करण्यात आला.

मात्र या निवडणुकीत केवळ नगराध्यक्षपदाचा निकालच महत्त्वाचा ठरलेला नाही. नगरपरिषदेच्या २० सदस्यीय सभागृहात काँग्रेसने १० जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळविले असले, तरी विकास योद्धा मंचने तब्बल ८ जागांवर विजय मिळवत नगरराजकारणात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध केले आहे. पहिल्याच मोठ्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात मंचची भूमिका निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपला अवघ्या २ जागांवर विजय मिळाल्याने पारंपरिक राजकीय पक्षांसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा विषय ठरत आहे. विशेषतः राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या तुलनेत स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि विकास योद्धा मंचला मिळालेला प्रतिसाद राजकीय विश्लेषकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

या निवडणुकीत विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि नागरी सुविधांचे प्रश्न केंद्रस्थानी राहिले. युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून अनेक प्रभागांमध्ये अपेक्षेपेक्षा वेगळे निकाल घडवून आणल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

add

आता नगराध्यक्षपद काँग्रेसकडे असले तरी सभागृहातील बलाबल लक्षात घेता विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. विकास योद्धा मंचच्या वाढलेल्या ताकदीमुळे नगरपरिषदेत अधिक आक्रमक आणि मुद्देसूद विरोधी राजकारण पाहायला मिळू शकते.

निवडणुकीतील विजय-पराभवाची धूळ खाली बसल्यानंतर आता नागरिकांचे लक्ष शहराच्या विकासाकडे लागले आहे. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाले आणि मूलभूत सुविधांबाबत नव्या नगरपरिषदेची कामगिरीच पुढील राजकीय दिशा ठरविणार असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top