Mahabreaking

[breaking_news]

District Collector :‘निक्षय मित्र’ बनून जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश

District Collector : प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला अधिक गती देण्यासाठी आणि जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी एक प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जपणारा पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वतः पुढे येत एका टीबी रुग्णाला पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेत त्याच्या पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.

.District Collector

पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारत जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशील कृती; टीबीमुक्ती अभियानाला बळ

बुलढाणा : प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला अधिक गती देण्यासाठी आणि जिल्ह्यातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी एक प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जपणारा पुढाकार घेतला आहे. त्यांनी स्वतः पुढे येत एका टीबी रुग्णाला पुढील सहा महिन्यांसाठी दत्तक घेत त्याच्या पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘निक्षय मित्र’ योजनेअंतर्गत टीबी रुग्णांना आवश्यक पोषण सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. क्षयरोगावरील उपचारांमध्ये औषधोपचाराबरोबरच सकस आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी संबंधित रुग्णाची भेट घेत त्याला पोषण आहाराचे किट सुपूर्द केले.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वर्षा गुट्टे तसेच क्षयरोग केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर खेरोडकर उपस्थित होते.

दत्तक कालावधीत रुग्णाला दरमहा देण्यात येणाऱ्या न्यूट्रिशन किटमध्ये गहू, ज्वारी अथवा बाजरी, विविध डाळी, खाद्यतेल तसेच दूध किंवा दूध पावडरचा समावेश करण्यात आला आहे. या पोषण सहाय्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार असून उपचार प्रक्रियेलाही बळ मिळणार आहे.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी सांगितले की, “टीबी हा केवळ आरोग्याचा विषय नसून सामाजिक जबाबदारीचाही भाग आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि उद्योजक यांनी मोठ्या संख्येने ‘निक्षय मित्र’ म्हणून नोंदणी करून टीबी रुग्णांच्या मदतीसाठी पुढे यावे.”

प्रत्येक रुग्णाला पोषण आहारासोबत मानसिक आधार मिळाल्यास बुलढाणा जिल्हा लवकरच टीबीमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे जिल्ह्यातील विविध विभागांतील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांमध्ये ‘निक्षय मित्र’ बनून टीबी रुग्णांना मदतीचा हात देण्याची सकारात्मक प्रेरणा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला जिल्ह्यात नवचैतन्य मिळत असल्याचे चित्र आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top