Mahabreaking

[breaking_news]

Gusty winds wreak havoc :वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचे मोठे नुकसान

Gusty winds wreak havoc : लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळात १२ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी  होत आहे.

Gusty winds wreak havoc

बीबी महसूल मंडळात नैसर्गिक आपत्तीचा फटका; नुकसानभरपाईची शेतकऱ्यांची मागणी

रमेश खंडागळे

बीबी : लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळात १२ जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोलार पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी  होत आहे.

बीबी महसूल मंडळातील बीबी, मांडवा, वर्दडी आणि चोरपांग्रा परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी बसविलेले सोलार पॅनल वादळी वाऱ्यामुळे उन्मळून खाली पडले. अनेक ठिकाणी सोलार पॅनल फुटले, वाकले आणि त्यांचे साहित्य खराब झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कृषी कामांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वादळामुळे केवळ सोलार पॅनलचेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या गोठ्यांवरील आणि घरांवरील टीनपत्रेही उडून गेली आहेत. गोठ्यांमध्ये पेरणीसाठी साठवून ठेवलेली खते तसेच जनावरांसाठी साठवलेला चारा पावसात भिजल्याने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज खांब आणि झाडे कोसळली असून काही घरांच्या भिंतीही पडल्याची माहिती मिळाली आहे.

या नुकसानीची पाहणी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली असून पंचनामे करण्यात आले आहेत. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि सोलार पॅनलसह इतर नुकसानग्रस्त मालमत्तेची नुकसानभरपाई लवकरात लवकर मंजूर करावी, अशी मागणी शेतकरी रामभाऊ सानप, सुधाकर मोरे आणि भारत जायभाये यांनी केली आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले असून कृषी कामकाज सुरळीत करण्यासाठी तातडीची मदत आवश्यक असल्याचेही शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top