Gutkha seller remanded : अन्न व औषध प्रशासनाने देऊळगाव महित ५४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त केला करून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली असून देऊळगाव राजा न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : अन्न व औषध प्रशासनाने देऊळगाव महित ५४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा केला जप्त केला करून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली असून देऊळगाव राजा न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
१५ जून रोजी सकाळी ९.४५ ते दुपारी ३ वाजेदरम्यान देऊळगावमही येथील एका इमारतीची पंचासमक्ष झडती घेण्यात आली. या झडतीमध्ये प्रिमियम नजर १००० पान मसाला, एन-०५ प्रिमियम च्युईंग तंबाखू, केसरयुक्त प्रिमियम नजर ९००० पान मसाला, विमल पान मसाला (किंग पॅक), व्ही-१ सुगंधित तंबाखू आणि राजनिवास सुगंधित पान मसाला असा विविध प्रकारचा प्रतिबंधित माल आढळून आला होता.या कारवाईत एकूण ५४ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तौसीफ खान सलीम खान रा. देउळगावमही याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे सरकारी वकील ॲड अनिल शेळके यांनी बाजू मांडली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन मिंड करीत आहेत.

