Mahabreaking

[breaking_news]

Buldhana Police :महिला सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांची मोठी पाऊले; सुसज्ज वाहनांसह ‘दामिनी’ पथके कार्यान्वित

Buldhana Police : महिला आणि मुलींच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये कार्यरत असलेल्या ‘दामिनी’ पथकांना सुसज्ज चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून काही नव्या पथकांचेही उद्घाटन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिला सुरक्षेसाठीची पोलिसांची यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.

Buldhana Police

छेडछाड व संवेदनशील गुन्ह्यांवर वचक; पाच उपविभागांत दामिनी पथके सज्ज

बुलढाणा : महिला आणि मुलींच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये कार्यरत असलेल्या ‘दामिनी’ पथकांना सुसज्ज चारचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून काही नव्या पथकांचेही उद्घाटन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिला सुरक्षेसाठीची पोलिसांची यंत्रणा अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी (१६ जून) झालेल्या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक (अमरावती परिक्षेत्र) डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत दामिनी पथकांना सुसज्ज वाहने प्रदान करण्यात आली.

महिला सुरक्षा व सक्षमीकरणाच्या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व उपविभागांत दामिनी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पथके शाळा, महाविद्यालये, महिला वसतिगृहे, बसस्थानके, रेल्वे स्थानके तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी नियमित गस्त घालून महिला व मुलींविरुद्ध होणाऱ्या छेडछाड, अत्याचार आणि इतर संवेदनशील गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्याचे काम करतात.

या कार्यक्रमात बुलढाणा व खामगाव उपविभागातील विद्यमान दामिनी पथकांना सुसज्ज चारचाकी वाहने देऊन अधिक बळकट करण्यात आले. तसेच देऊळगाव राजा, मलकापूर आणि मेहकर उपविभागांमध्ये नव्याने दामिनी पथके सुरू करून त्यांना आवश्यक वाहने व महिला कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी डॉ. महेश पाटील यांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीने दामिनी पथकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. आधुनिक सुविधा आणि तत्पर प्रतिसादामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, मनिषा कदम, संतोष खाडे, प्रदीप पाटील, पोलीस उपअधीक्षक (गृह) बाळकृष्ण पावरा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक काकविपुरे, मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन वानखडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेला हा उपक्रम भविष्यात अधिक प्रभावीपणे राबविला जाणार असून संवेदनशील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दामिनी पथके सातत्याने कार्यरत राहतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top