Mahabreaking

[breaking_news]

B. S. Tayade :कुंभारीच्या बी. एस. तायडे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’

B. S. Tayade : जय बजरंग विद्यालय, कुंभारी येथील स्काऊट मास्टर तथा क्रीडा शिक्षक बबलू एस. तायडे यांना शैक्षणिक, क्रीडा, कला तसेच स्काऊट-गाईड क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

B. S. Tayade

 शैक्षणिक, क्रीडा व स्काऊट क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; बबलू तायडे यांचा राष्ट्रीय सन्मान

संजय तायडे

बोरगाव मंजू : जय बजरंग विद्यालय, कुंभारी येथील स्काऊट मास्टर तथा क्रीडा शिक्षक बबलू एस. तायडे यांना शैक्षणिक, क्रीडा, कला तसेच स्काऊट-गाईड क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथील ज्ञानदीप सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. नाशिक येथील समुद्रा लॉन्स येथे पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तायडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बबलू तायडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण, क्रीडा आणि स्काऊट-गाईड क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान जाहीर करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे कुंभारी परिसरासह शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर तायडे यांनी संस्थेचे संस्थापक, माजी आमदार स्वर्गीय प्रा. तुकाराम भाऊ बिरकड यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष नारायणराव गावंडे, श्रीकृष्ण बिरकड गुरुजी, चंद्रभानजी अतकरे, प्रकाश बिरकड, शत्रुघ्न बिरकड, विलास इंगळे, प्राचार्य डॉ. सूर्यभान नागुलकर, पर्यवेक्षक प्रा. श्रीराम पालकर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले.

तायडे यांच्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या कार्यामुळे परिसरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top