Mahabreaking

[breaking_news]

New leadership :उरळ पोलीस ठाण्याला नवे नेतृत्व; एपीआय जनार्दन खंडेराव यांनी स्वीकारला पदभार

New leadership : बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) जनार्दन खंडेराव यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. कर्तव्यदक्ष, सौम्य स्वभावाचे आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या खंडेराव यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.

New leadership

अवैध धंद्यांवर कारवाईची अपेक्षा;  शांतता, सुव्यवस्था आणि जनसंपर्कावर भर

बाळापूर : बाळापूर तालुक्यातील उरळ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) जनार्दन खंडेराव यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. कर्तव्यदक्ष, सौम्य स्वभावाचे आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेल्या खंडेराव यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.

उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढून सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

नवीन ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विविध गावांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी जनार्दन खंडेराव यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

परिसरात शांतता व सौहार्दाचे वातावरण कायम राखणे, विविध समाजघटकांमध्ये समन्वय निर्माण करणे, गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालणे तसेच अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. विशेषतः अवैध धंदे, वाळू तस्करी, जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर प्रकारांवर प्रभावी अंकुश ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जनार्दन खंडेराव यांच्या कार्यकाळात पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ होईल, तसेच ऊरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरक्षित, शांततापूर्ण आणि कायद्याचे राज्य अधिक मजबूत होईल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top