Mahabreaking

[breaking_news]

Tree plantation :राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त देऊळगाव राजात वृक्षारोपण 

Tree plantation : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त देऊळगाव राजा शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.

Tree plantation
अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त देऊळगाव राजा शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वृक्षसंवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, ज्येष्ठ नेते सुभाष दराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवान खरात, नगरपरिषद गटनेते प्रदीप वाघ, नगरपालिका बांधकाम सभापती विष्णू झोरे, भानुदास कोल्हे, तुषार शिपणे, राजेंद्र खांडेभराड, सुनील शेजुळकर शहराध्यक्ष,, गजानन काकड, अफरोज बाबा, प्रकाश खांडेभराड, विकास कासारे, नासेर बागवान, लक्ष्मण कवळे, गौरव गीते, अतिक भाई, गोविंद तिडके, नारायण मुंडे, सोनू गवई, अशपाक टेलर, नाजीम भाई, संतोष शिंगणे, रफिक भाई, शुभम कायंदे, सुखदेव शिरसाट, अक्षय कायंदे, असगर शहा, शांताराम भाग्यवंत, अमर शेटे, इसाक भाई, बंडू कवळे, रमेश जावळे (मामा), बबन कासारे, रामकिसन कवळे, बंडू झोरे, अरविंद खांडेभराड, नईमभाई, मनोज खांडेभराड, अनिकेत खांडेभराड, संदेश वाघ व बबलू जायभाये यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा घेत पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देऊळगाव राजा शहर शाखेच्या वतीने करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top