Mahabreaking

[breaking_news]

Gutkha worth ₹5.78 lakh seized  :देऊळघाट येथे ५.७८ लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Gutkha worth ₹5.78 lakh seized  : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक आणि विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत ५ लाख ७८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळघाट परिसरात रविवारी करण्यात आली.

Gutkha worth ₹5.78 lakh seized

 स्विफ्ट डिझायरमधून सुरू होती गुटख्याची वाहतूक; एक आरोपी ताब्यात

बुलढाणा  : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक आणि विक्रीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत ५ लाख ७८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देऊळघाट परिसरात रविवारी करण्यात आली.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी स्वतंत्र पथके तयार करून विशेष मोहीम राबविली.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एक व्यक्ती मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (क्र. MH-28-ET-5300) या वाहनातून शासन प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे देऊळघाट येथे सापळा रचून वाहनाची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाल्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह संपूर्ण मुद्देमाल जप्त करत चालकाला ताब्यात घेतले. या कारवाईत शेख सलीम शेख इस्माईल (वय ५९, रा. सैलानीनगर, चिखली) याला अटक करण्यात आली. आरोपीकडून ३ लाख २८ हजार ९०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पान मसाला तसेच २ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण ५ लाख ७८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा (खामगाव) आणि अमोल गायकवाड (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक आशिष रोही यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. दीपक लेकुरवाळे, विजय वारुळे, अनुपकुमार मेहेर, राजेंद्र टेकाळे आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल वनारे यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top