Mahabreaking

[breaking_news]

Thieves on the rampage :बाळापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; मेडिकलमधून ४० हजारांची रोकड लंपास

Thieves on the rampage : तालुक्यात अवघ्या दोन दिवसांत दोन मेडिकल दुकाने चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. एका ठिकाणी चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली, तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची घटना उघडकीस आली आहे.

Thieves on the rampage

दोन दिवसांत दोन मेडिकल दुकाने चोरट्यांच्या निशाण्यावर; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

जाकीर अहमद शेख

बाळापूर : तालुक्यात अवघ्या दोन दिवसांत दोन मेडिकल दुकाने चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. एका ठिकाणी चोरट्यांनी ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली, तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास बाळापूर शहरातील अकोला नाका परिसरातील मनीष मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दुकानाचे शटर खालच्या बाजूने उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकांच्या निदर्शनास ही बाब आली. मात्र, प्राथमिक माहितीनुसार दुकानातील रोकड अथवा अन्य कोणताही माल चोरीला गेला नसल्याचे समोर आले आहे.

विशेष म्हणजे, मागील एका वर्षात याच मेडिकलमध्ये दोन वेळा चोरीच्या घटना घडल्या असून, यापूर्वीच्या घटनेत सुमारे ३५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती.

दरम्यान, ५ जूनच्या रात्री तालुक्यातील वाडेगाव येथील माऊली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. या घटनेत दुकानातील सुमारे ४० हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याचे सकाळी दुकान मालकांच्या निदर्शनास आले.

दोन दिवसांत बाळापूर शहर आणि वाडेगाव येथे घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांसह व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.घटनेची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे समजते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top