Mahabreaking

[breaking_news]

14 Electric Pumps :पैनगंगा नदीकाठावरील १४ विद्युत पंप फोडले; तांब्याच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या

14 Electric Pumps : मेहकर तालुक्यातील नांद्रा नजीक भालेगाव शिवारातील पैनगंगा नदीकाठावरील शेतांमध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल १३ ते १४ विद्युत पंप फोडून त्यातील तांब्याच्या तारा व इतर साहित्य लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

14 Electric Pumps
खरीपपूर्वी शेतकऱ्यांना मोठा धक्का; भालेगाव शिवारात पंपफोडी करून चोरी

हिवरा आश्रम : मेहकर तालुक्यातील नांद्रा नजीक भालेगाव शिवारातील पैनगंगा नदीकाठावरील शेतांमध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल १३ ते १४ विद्युत पंप फोडून त्यातील तांब्याच्या तारा व इतर साहित्य लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास शेतातील विद्युत पंपांना लक्ष्य करत त्यांचे नुकसान केले. पंप फोडून त्यामधील तांब्याच्या तारा तसेच अन्य मौल्यवान साहित्य चोरून नेण्यात आले. गुरुवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या उपकरणांची चोरी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. आधीच वाढते उत्पादन खर्च, अनियमित हवामान आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या घटनेमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या प्रकरणातील चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच शेतशिवारातील चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top