Mahabreaking

[breaking_news]

Statue of Lord Buddha :अनाथपिंड बुद्ध विहारात भगवान बुध्दांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

Statue of Lord Buddha : येथील सिद्धार्थ नगरस्थित अनाथपिंड बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पार पडली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विश्वशांती आणि मानवकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

Statue of Lord Buddha

थायलंडहून आणली मूर्ती; बोरगाव मंजू येथे धम्म रॅली व धम्मदेशना शिबिर उत्साहात

संजय तायडे

बोरगाव मंजू : येथील सिद्धार्थ नगरस्थित अनाथपिंड बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पार पडली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विश्वशांती आणि मानवकल्याणासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

थायलंडमध्ये निर्मित भगवान बुद्धांची भव्य मूर्ती विशेष सजविलेल्या रथात ठेवून शहरातून धम्म रॅली काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली सिद्धार्थ नगर येथील बुद्ध विहारात पोहोचली. धम्म रॅलीदरम्यान परिसरात उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

Statue of Lord Buddha

या कार्यक्रमासाठी दानदाते मधुकरराव तायडे, यशोदाबाई तायडे, राहुल तायडे (उपजिल्हाधिकारी, यवतमाळ) आणि हर्षा राहुल तायडे यांनी भगवान बुद्धांची मूर्ती तसेच भिक्षू संघासाठी आवश्यक साहित्याचे किट दान केले. त्यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी एकदिवसीय धम्मदेशना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भदंत शीलरत्न महाथेरो होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पूज्य भदंत बी. संघपालजी महाथेरो यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली. तसेच पूज्य भदंत विनयपालजी महाथेरो, पूज्य भदंत शक्यपुत्र राहुल, पूज्य भदंत सुमंगल महाथेरो, भिक्षू संबोधी, भिक्षू राजज्योती आणि पूज्य भंते माहाणाम यांनी उपस्थित उपासक-उपासिकांना बौद्ध धम्माचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी खासदार बळवंत वानखडे, भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे, नंदकुमार डोंगरे, विजय जाधव, धम्मबोधी डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

धम्म रॅली, बुद्ध स्तूप विहार लोकार्पण आणि मूर्ती प्रतिष्ठापना अशा विविध कार्यक्रमांनी हा सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनाथपिंड बुद्ध विहार, आम्रपाली उपासक-उपासिका संघ, सिद्धार्थ नवयुग मंडळ, विशाखा उपासिका मंडळ, पंचशील नवयुग मंडळ, पंचशील व्यायामशाळा लेझीम पथक, सुजाता उपासक-उपासिका संघ, नवयुग मंडळ भीमनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्येष्ठ सेवा समिती यांचे विशेष सहकार्य लाभले.दरम्यान या धार्मिक कार्यक्रमांचे सुत्रसंचलन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त साहेबराव मोरडे यांनी तर प्रास्ताविक प्रा सचिन तायडे यांनी केले

 

  दानशूर व्यक्तींचा सत्कार

बोरगाव मंजू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेसाठी स्वमालकीचे दोन प्लॉट दान करणाऱ्या यशोदाबाई मधुकरराव तायडे आणि लक्ष्मीबाई वामनराव वानखेडे यांचा भिक्षू संघाच्या वतीने साडी-चोळी देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या अभ्यासिकेतून आतापर्यंत २२८ विद्यार्थी विविध शासकीय व निमशासकीय पदांवर रुजू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top