Mahabreaking

[breaking_news]

Savta Parishad : वाशिममध्ये ७ जूनला सावता परिषदेची जनगणना परिषद; ओबीसी प्रश्नांवर होणार मंथन

Savta Parishad : येत्या ७ जून रोजी वाशिम शहरात सावता परिषदेच्या वतीने जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील सावता परिषदेचे पदाधिकारी तसेच ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, जनगणना आणि ओबीसी या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही एकदिवसीय जनगणना परिषद आयोजित करण्यात आली आहे.

Savta Parishad

 निशांत गवई

पातूर : येत्या ७ जून रोजी वाशिम शहरात सावता परिषदेच्या वतीने जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत महाराष्ट्रातील सावता परिषदेचे पदाधिकारी तसेच ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, जनगणना आणि ओबीसी या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही एकदिवसीय जनगणना परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेसंदर्भात नियोजनासाठी रविवार, दि. २४ मे २०२६ रोजी वाशिम येथील विश्रामगृहात वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून परिषद यशस्वी करण्यासाठी सविस्तर नियोजन करण्यात आले.

ही बैठक सावता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष पांडुरंग कोठाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रदेश सहसचिव प्रवीणभाऊ वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष रवि भांदुर्गे, अकोला जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव निखाडे, खामगाव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ जावळकर, वाशिम जिल्हाध्यक्ष विलास ढगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रंजनाताई परिसकर, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शेखर जटाळे, वाशिम जिल्हा उपाध्यक्ष रवि वानखेडे, वाशिम शहराध्यक्ष चेतन इंगोले, पातूर तालुका अध्यक्ष अजय ढोणे, अकोला जिल्हा उपाध्यक्ष छोटू काळपांडे, वाशिम तालुका अध्यक्ष बाळूभाऊ माल, खामगाव येथील अमोल धामणकर, अमोल चरखे, गजानन उठाळे, मंगरूळपीर तालुका अध्यक्ष चेतन शिंदे, रिसोड महिला आघाडी शहराध्यक्ष रेखाताई जहीरव, तालुका अध्यक्ष दिपालीताई काळे, अकोला महानगर अध्यक्ष दिनेश सोळंके यांच्यासह मंगला भांदुर्गे, शितल जाधव, ज्योती जाधव, नीता जाधव, वंदना वानखेडे, सुनिता पुंड, ज्योती इरतकर, अपर्णा सोनवणे, गोदावरी रतकर, गीता भांदुर्गे, ज्योती सोनवणे, शोभा इरतकर, वंदना भांदुर्गे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तिन्ही जिल्ह्यांतील मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सहभाग घेतला. यावेळी सर्वानुमते ७ जून रोजी होणारी जनगणना परिषद यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान, गजानन ठेंगडे, अमोल गाभणे, सुनील वानखेडे, आकाश गायकवाड आणि रवी खोटे यांना सावता परिषदेत प्रवेश देण्यात आला. जनगणना परिषदेसाठी पातूर तालुक्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सावता परिषद पातूर तालुका अध्यक्ष अजय ढोणे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top