Mahabreaking

[breaking_news]

Eid-ul-Adha :मलकापूर पांगरा येथे ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

Eid-ul-Adha : परिसरात पवित्र ईद-उल-अजहा (बकरी ईद) मोठ्या आनंद, उत्साह आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. मलकापूर पांगरा येथील पेट्रोल पंपाजवळील कब्रस्तान ईदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता विशेष सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

Eid-ul-Adha

जागतिक शांतीसाठी मुस्लिम बांधवांची सामूहिक प्रार्थना

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : परिसरात पवित्र ईद-उल-अजहा (बकरी ईद) मोठ्या आनंद, उत्साह आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. मलकापूर पांगरा येथील पेट्रोल पंपाजवळील कब्रस्तान ईदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता विशेष सामूहिक नमाज अदा करण्यात आली.

यावेळी हुसेनिया मस्जिदचे मौलाना साबीर शेख व मौलाना अब्दुल वाहिद यांनी ईद-उल-अजहाच्या धार्मिक महत्त्वाविषयी मार्गदर्शन केले. तसेच साईनगर येथील दुसऱ्या ईदगाहवर जामा मशिदचे मौलाना आलिम शाकीर रजा आणि कलंदर बाबा यांनीही विशेष नमाज व ईदच्या संदेशाविषयी माहिती दिली.

नमाज अदा झाल्यानंतर मौलानांनी जागतिक शांतता, हिंदू-मुस्लिम ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा तसेच शेतकरी व गरजू घटकांच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना केली. समाजात प्रेम, बंधुभाव आणि शांतता नांदावी, अशी दुआही यावेळी करण्यात आली.

मुस्लिम धर्मीयांचा आनंद व उत्साहाचा प्रमुख सण मानल्या जाणाऱ्या ईद-उल-अजहानिमित्त ईदगाह मैदानावर लहान मुलांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद पाहायला मिळाला. सामूहिक नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, येथील हिंदू व बौद्ध बांधवांनीही ईदच्या शुभेच्छा देत सर्वधर्म समभावाचे सुंदर दर्शन घडविले.

दरम्यान, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानेही बंदोबस्ताची विशेष व्यवस्था केली होती. ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार गणेश डोईफोडे, बीट जमादार निवृत्ती पोफळे, पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे व इतर सहकारी सकाळपासूनच बंदोबस्तासाठी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या.

गावात दिवसभर भाईचारा, आनंद आणि सामाजिक एकोप्याचे वातावरण पाहायला मिळाले. सर्वधर्मीय बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत शुभेच्छांची देवाणघेवाण केली आणि एकतेचा संदेश दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top