Mahabreaking

[breaking_news]

Youth Succumb to Addiction :तरुण व्यसनाधीन, गावाची शांतता धोक्यात; अवैध दारूविक्रीविरोधात ग्रामस्थ आक्रमक

Youth Succumb to Addiction : तालुक्यातील असोला जहागीर येथील ग्रामस्थांनी गावात सुरू असलेल्या कथित अवैध देशी दारू विक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. गावातील तरुण आणि मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून गावातील शांतता व सामाजिक वातावरण धोक्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

Youth Succumb to Addiction

 असोला जहागीर ग्रामस्थांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील असोला जहागीर येथील ग्रामस्थांनी गावात सुरू असलेल्या कथित अवैध देशी दारू विक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले. गावातील तरुण आणि मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून गावातील शांतता व सामाजिक वातावरण धोक्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, गेल्या दोन वर्षांपासून असोला जहागीर फाटा, चिखली रोड व आळंद रोड परिसरातील शेतांमध्ये खुलेआम अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे अनेक तरुण शिक्षणापासून दूर जात असून मजूर वर्गाचे संसार उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दारूच्या व्यसनामुळे कौटुंबिक वाद, मारहाण, चोरी आणि अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

निवेदनात गंभीर आरोप करत ग्रामस्थांनी म्हटले आहे की, या प्रकरणाची माहिती वारंवार पोलिसांना देऊनही प्रभावी कारवाई होत नसून केवळ कारवाईचा देखावा केला जात आहे. संबंधित अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरोधात २० ते २५ गुन्ह्यांची नोंद असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असला तरी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारी किंवा वाहन-जागा जप्तीची प्रक्रिया करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दि. २३ मे रोजी सकाळी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिल्यानंतरही तत्काळ कारवाई झाली नसल्याचे निवेदनात नमूद आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही प्रभावी छापा न पडल्याने संबंधितांना दारूसाठा हटविण्याची संधी मिळाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी अवैध देशी दारू विक्री तात्काळ बंद करून संबंधित प्रकरणाची चौकशी करावी तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  निवेदनावर सरपंच जनार्दन चित्तेकर, राजू मान्टे, विकास आंधळे, अमोल काकड, गजानन शेळके, सुभाष मुंढे, योगेश मुंढे आदींसह ग्रामस्थांची स्वाक्षरी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top